शनिवार, ७ मे, २०११

अनौरस

आसुसुन तीने बाळाला हातात घेतले
आणि गुंतत गेली ती त्या बाळवासात
तो कोवळा नाजुक नवथर वास ती
साठवत रहिली श्वासात पान्ह्यात काळजात

सगळ संपल असली तरी आईपण
अजुन एवढ ताज कस? तीला नेहमी वाटे
सृजनाचा तो सोहळा पहाताना नेहमीच
वेदना आणी सुखही तिच्याही गात्रातुन दाटॆ

फ़ुलांचा भार पेलण्याची ताकद असुनही
काही वेलींना पानांची वेदना जपावी लागते
मुळच काय आधाराचे वृक्ष ही उन्मळून पडले
तरी वांझपणाचीही धुरा सांभाळायची असते

सहज मन दुसरी कडे जाव म्हणून
खिडकी बाहेर जाते तीचि नजर
चिंध्यात गुंडाळलेल अस्ताव्यस्त
नजरेला पडत एक देहाच लक्तर

हो ती तीच वेडी असते नेहमी
घरसमोरच्या रस्त्यावर हिंडणारी
डोळ्यात आख्ख शुन्य होत तिच्या
पन लक्तरातून होती न लपणारी उभारी

आज नेहमीच्या हालचालीत त्या वेडिच्या
एक अस्वस्थ जडपणा भरुन राहिला होता
खिडकी जरी आड असली दोघींच्या तरी
तीला तो क्षणाक्षणाला जाणवत होता

न राहवून ती उतरलीच झपाझप जीने
वेडी डोळ्यात शुन्य घेवुन निर्मळ हसुन गेली
आणि तीच्या वाढलेल्या पोटाकडे बघुन
हसता हसता हीची पावल थिजुन गेली

अनुजा(स्वप्नजा)

1 टिप्पणी:

  1. जबरदस्त.. अनुजा..
    ह्या कवितेत करुण आणि बीभत्स रासाचम मिश्रण आहे.. आणि त्याने अद्भुत परिणाम साधलाय..
    एक अतिशय वेगळा, आव्हानात्मक विषय तू समर्थपणे पेलला आहेस.
    ग्रेट.. सिम्पली ग्रेट..!

    उत्तर द्याहटवा