उत्कटतेच्या असीम सीमेवरी मज थांबवू नको असा
पहा विसरली हा आवर्ण्याला रातराणीही सुगंध पसा
रक्तलालिमा पूर्व दिशेचा उजळूनही कसा फिक्कटसा
अडकुन पडला जराजरासा तुझ्या मिठीने चंद्र जसा
कुंतलकाळ्या रजनीडोही विरघळला हा पहाट्वारा
अनवट वळणावरी दवाचा मोहून ओला थिजे पसारा
सतार तारा पापणीत या फिरतो अचपळ फुंकर पारा
नको थांबवू छेडीत जा तू स्पर्श सरीच्या मधुर धारा
उषेस सार्या मिठीत घेते काजळ रेषा फिसकटलेली
नकोच घाई सावरण्याची हळू निनादे स्वप्न पाकळी
अजून ही ओलस लालस आहे ओठांची ही अमृतलेणी
थांब रे अजूनही साद घालते हृदयांची स्पंदन गाणी
सैल न झाली मुग्धगंध प्राजक्त कळी बघ फांदीवरची
कशी निसटली मग ओठातली केशरकाडी अधरांची
लीपिभाषेची तोडून सीमा आज उमगली नवीन भाषा
कळले वारुणीहुनी गहरी असते डोळ्यांची मौन नशा
अनुजा (स्वप्नजा)

कंगोर्याला हा शब्दा खरेतर कंगोऱ्याला असा लिहितात... चूक काढणे हा हेतू नसून योग्य दर्शविण्याचा प्रयत्न...
उत्तर द्याहटवाokey i will correct it no issue
उत्तर द्याहटवा