सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

एक कळी


एक कळी फुल झाली आणि हसून झाडाला म्हणली 

बाबा निघाले मी , माझ्या घरी 

झाड गदगदले  आणि बोलले 
एवढे ऋतू कधी सरले .....
आत्ता परवा तर उन्ह ओटीवर यायचं 
तेव्हा पानांचं दुपट पांघरून 
लपेटून घ्यायचो 
फुल होतानाही तिला 
माझी कळीच ग  तु म्हणायचो 

वाटायचं सोसतील का हिला 
हिवाळे पावसाळे 
सुगंधाने भरून न  जाता पशु होणारे 
मेघ कभिन्न काळे माणूस थांबून राहतो निसर्ग नाही 
तळहातावर जपलेल्या कळीला 
उमलण्याची घाई 
जा बाई सुखी राहा 
माझ्या पानाचा आसरा 
मनी जपून राहा 

अनुजा रमेश मुळे 

1 टिप्पणी:

  1. छान, खूप छान! अप्रतिम रेखाटलंय तुम्ही स्रीच्या आयुष्यातील एक कडू-गोड वळण! निसर्ग नियमानुसार पुढे जाण्याची एक गोड ओढ, आणि मागच एक सुरक्षित जीवन सोडून जाण्याची कडू वेळ!

    उत्तर द्याहटवा